Ad will apear here
Next
महिला आयोगच्या ‘वारी नारीशक्तीची’मध्ये आरोग्य संदेश

पुणे : ‘आषाढी पालखीनिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे ‘वारी नारीशक्ती’ची या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज एका क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असणाऱ्या या सक्षमीकरणाच्या दिंडीमध्ये २९ जून रोजी डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र खेनट आणि डॉ. संगीता खेनट यांच्या नेतृत्वाखाली २० सभासदांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. सासवड मुक्काम ठिकाणी हा उपक्रम झाला,’ अशी माहिती महिला आयोगाच्या वारी नारीशाक्तीची उपक्रम संयोजिका उषा बाजपेयी यांनी दिली. 

डॉक्टरांच्या विशेष पथकाने आयोगाच्या चित्ररथावरील सॅनेटरिन नॅपकिनचे महत्त्व सांगितले. अध्यात्यामाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत स्वत:चे व समाजाचे आरोग्य कसे जपावे याचे मार्गदर्शन केले; तसेच वारीतील मार्गावर कमीतकमी प्रदूषण होण्यासाठीचे उपाय सांगितले. डॉक्टर्स आणि वारकरी संवाद उपक्रमाला सुवर्णा जोशी, अ‍ॅड. वर्षा डहाळे, मुकुंद वर्मा यांनी सहकार्य केले. या दिंडीमध्ये महिला सक्षमीकरणाचे संदेश देण्यासाठी वारीच्या दोन्ही मार्गांवर फिरता चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत २९ जूनला ‘दिवली नाही विझता कामा’ हा लघुपट आणि ‘दामिनी’ हा चित्रपट दाखविण्यात आला. 


या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची आहे. त्यांनी उषा बाजपेयी यांच्याकडे दिंडी उपक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी दिली आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आमंत्रित करणे हे प्रमुख कार्य त्या करीत आहेत. ३० जूनला क्रीडापटूंनी वारकऱ्यांशी संवाद साधला. यात मराठी चित्रपट कलाकार, डॉक्टर्स, क्रीडापटू, वास्तूरचनाकार, वकील, स्वयंसेवी संस्था, आर्मी ऑफिसर, मुस्लिम महिलांचे पथक यांचा सहभाग आहे. या उपक्रमातील चित्ररथ आणि महिला सक्षमीकरण दिंडीचा शुभारंभ शनिवारवाडा पुणे येथे झाला. 

महिला सक्षमीकरण हा या दिंडीचा प्रमुख उद्देश आहे. आषाढीची वारी हा महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मक वारसा आहे. या वारीत लक्षावधीच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. यात महिलांचा लक्षणीय सहभाग असतो. अध्यात्माचा समाजप्रबोधनासाठी प्रभावी वापर हे वारीचे खरे सूत्रे आहे. या सूत्राला अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचे कार्य महिला आयोग करत आहे. 

‘वारी नारीशक्तीची’ या उपक्रमांतर्गत चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी समाजप्रबोधनाचे कार्य करणार आहे. महिला सक्षमीकरण या संकल्पनेवर आधारित महिलाचे कीर्तन, भारूड याचे आयोजन करण्यात येत आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZXPCC
Similar Posts
‘एमटीडीसी’कडून आषाढी वारी दर्शन सहलीचे आयोजन पुणे : ‘सध्या सुरू असलेल्या आषाढी वारीमधील आगळावेगळा सोहळा, तसेच वारकरी बांधवांना अनुभवास येणारी अध्यात्मिक अनुभूती शहरी माणसांनादेखील अनुभवण्यास मिळावी, या हेतूने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) या वर्षीदेखील वारी दर्शन सहलीचे आयोजन केले आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे
कडुनिंब लागवडीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद पुणे : ‘निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ हे अभियान महत्त्वपूर्ण असून, राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात केलेल्या कडुनिंब लागवडीच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमुळे देशाचे नाव जगाच्या नकाशावर गेले असून, यात सहभागी झालेले
‘वारी नारीशक्तीमुळे महिलांसाठीच्या योजनांच्या प्रसाराला व्यासपीठ’ पुणे : ‘वारी नारीशक्तीची उपक्रमाने महिलांसाठीच्या योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी नवे व्यासपीठ मिळाले आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
‘आषाढी वारीसाठी सर्व यंत्रणेने समन्वयाने काम करावे’ पुणे : ‘पंढरपूरची आषाढी वारी महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा श्रद्धेचा विषय आहे. हा आनंदी सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणेने समन्वय ठेवून काम करावे,’ असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language